जालना: जुन्या जालन्यात किराणा दुकानावर पोलिसांचा छापा; प्रतिबंधित गुटखा जप्त; मोरंडी मोहल्ल्यातील कारवाई
Jalna, Jalna | Jul 8, 2026 जुन्या जालन्यातील मोरंडी मोहल्ला परिसरातील एका किराणा दुकानावर कदीम जालना पोलिसांनी छापा टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू, पान मसाला, गुटखा आणि जर्द्याचा साठा जप्त केला. बुधवार दि. 8 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत 5 हजार 696 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,किराणा दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कदीम जालना पोलीस ठाण्यातील बाजार चौकीचे अंमलदार आणि सहकार्याने कारवाई केली.