खालापूर: खोपोलीत 1 लाखांचा चार किलो गांजा जप्त
खोपोली शहरात माय-लेक मिळून गांजा विक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत चार किलो गांजा, मोबाईल फोन आणि विक्रीसाठी लागणारे साहित्य असा सुमारे 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक केली आहे. नवनाथ कॉलनी, पटेलनगर शिळफाटा परिसरात अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 19 मे रोजी दुपारी पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.