नागपूर शहर: देशातील पहिल्या सीबीजी प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी
नागपूरच्या स्वच्छता अभियानाला आणि हरित ऊर्जानिर्मितीला गती देण्यासाठी देशातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या भांडेवाडी बायोगॅस प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.