नागपूर शहर: कलमना पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गाईसह कार चोरी करणाऱ्या टोळीला अटक: प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी नऊ मेला दुपारी 5:30 वाजता दिलेल्या माहितीनुसार कलमना पोलिसांनी चोरीचे दोन गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. आरोपि विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे.