पाचोरा: अंबे वडगाव शिवारात असलेल्या पी. सी. के. कॉटन जिनिंगला लागली आग, अग्निशामक दलाचे शेतीचे प्रयत्न सुरू,
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव शिवारात असलेल्या पी. सी. के. कॉटन जिनिंग मध्ये दिनांक 09 जानेवारी गुरुवार रोजी मध्यरात्री अचानक कापसाच्या साठवलेल्या गठाणींना आग लागल्याची घटना घडली. या आगीत जिनिंग मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास जिनिंग परिसरातून धुराचे लोळ व आगीच्या ज्वाळा दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच पाचोरा नगरपालिका अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. oÀaaà