नागपूर शहर: इनर रिंगरोडवर खाजगी ट्रॅव्हल्सना बंदी; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई
शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या इनर रिंगरोड परिसरात सकाळी ०८:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत खाजगी ट्रॅव्हल्सना पार्किंग, तसेच प्रवाशांच्या पिकअप आणि ड्रॉपसाठी बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भात १२ मार्च २०२६ रोजी अधिकृत अधिसूचना निर्गमीत करण्यात आली होती. ६ मे रोजी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २ खाजगी ट्रॅव्हल्स बसेसवर कारवाई करण्यात आली.