मोर्शी: मोर्शी शहर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने, मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात फार्मासिस्ट डे साजरा
आज दिनांक 25 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे फार्मसीस्ट डे आयोजन करण्यात आले होते. मोर्शी केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून, रुग्णालयातील औषधाचा तुटवडा पाहून सलाईन व औषधे रुग्णालयात देण्यात आले. यावेळी अल्पपहाराचे आयोजन देखील करण्यात आले होते. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद पोतदार यांचे प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला