घनसावंगी: खाजगी शाळांकडून साहित्य खरेदीस भाग पाडण्याचा प्रकार; चौकशीची मागणी
जालना जिल्ह्यातील काही खाजगी शाळांकडून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांतूनच शालेय साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी अंकुश श्रीमंतराव बोबडे यांनी केली आहे. जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, काही शाळा चालक विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, बॅग, बूट, गणवेश आदी साहित्य ठराविक दुकानांतूनच खरेदी करण्यास सांगतात. त्यामुळे पालकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे.