अलिबाग: पर्यटकांसाठी मोठी बातमी; अलिबाग फेरीला पावसाळी ब्रेक
Alibag, Raigad | May 18, 2026 मुंबई ते अलिबाग प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते रायगड जिल्ह्यातील मांडवा दरम्यान धावणाऱ्या प्रवासी फेरी सेवेला येत्या 25 मे 2026 पासून पावसाळी ब्रेक लागणार आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने सुरक्षेच्या कारणास्तव ही सेवा 31 ऑगस्ट 2026 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुंबई-मांडवा जलवाहतुकीचा यंदाचा हंगाम संपुष्टात येणार असून 25 मे हा शेवटचा प्रवासी दिवस असणार आहे.