नागपूर शहर: कपिल नगर पोलिसांची कारवाई: एमडी ड्रग्जसह तरुण अटकेत: सतीश आडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कपिलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी 18 जूनला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार,कपिल नगर पोलिसांनी 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत मोठी कारवाई करत कबीर नगर चौक परिसरातून तुलशीराम रामनाथ ठाकुर याला अटक केली. त्याच्याकडून १२१.६३ ग्रॅम एमडी ड्रग्जसह दुचाकी, मोबाइल, वजन काटा आणि रोख रक्कम असा एकूण ६,७७,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली आहे.