भोकरदन: राजुर येथे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते पार पडली गणरायाची आरती
आज दिनांक 19 सप्टेंबर 2024 वार शनिवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र राजुर येथे लाडक्या गणरायाची महाआरती पार पडलेली आहे महाआरती भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते पार पडली असून अगदी भक्तिमय वातावरणामध्ये विधिवत पूजन करत ही महाआरती दानवे यांनी केली आहे, याप्रसंगी मंदिर समितीचे पदाधिकारी व राजुर परिसरात शेकडो च्या संख्येने आलेले गणनायाचे भक्त नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.