वर्धा जिल्ह्यात जिथे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अगदी तोंडावर रामनगर पोलिसांनी धडक कारवाई करत बनावट दारूचा एक मोठा कारखाना उघडकीस आणला आहे! रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिंदनगर परिसरात हा कारखाना सर्रासपणे सुरू होता. गुप्त माहितीच्या आधारावर काल रात्री दहा वाजता रामनगर पोलिसांनी येथे धाड टाकली. असल्याचे आज 30 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता रामनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांनी माहिती दिली आहे.