पनवेल: पनवेल प्रभाग क्रमांक १९ मधील व्यापाऱ्यांच्या विजेच्या समस्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक
Panvel, Raigad | Oct 17, 2025 रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, मार्केट यार्ड पनवेल येथे प्रभाग क्रमांक १९ येथे आज शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास व्यापाऱ्यांना सतत भेडसावत असलेल्या विजेच्या अडचणी जसे की वारंवार होणारी लाईट जाणे आणि त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान या गंभीर विषयावर महावितरणच्या डी.आर पाटील आणि त्यांचे अधिकाऱ्यांसोबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली व त्यांनी आपली व्यथा आणि अडचणी स्पष्टपणे मांडल्या. विजेच्या अपुरवठ्यामुळे व्यवसायावर होणाऱ्या परिणामांची माहिती अधिकाऱ्यांना दिली गेली. यावेळी अधिकाऱ्यांकडून समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.