नागपूर शहर: नीट पेपरफुटीवरून काँग्रेस आक्रमक; उपरोधिक विशेष धन्यवाद करण्यासाठी वाटण्यात आली मिठाई
गेल्या दहा वर्षांपासून देशात सातत्याने विविध परीक्षांचे पेपर फुटत असल्याचा आरोप करत आज काँग्रेसने केंद्र सरकारविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. नीट परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ नागपूर मध्ये मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात निदर्शने केली.'ज्या सरकारला परीक्षा घेता येत नाही, ते देश काय चालवणार?'या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेस नेत्याने माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर सडकून टीका केली