पोलीस स्टेशन खापरखेडा हद्दीत दहेगाव (रंगारी) शिवारात एका भीषण रस्ता अपघातात निखिल संजय चकोल या तरुण फार्मासिस्टचा मृत्यू झाला..निखिलचा 'न्यू लाईफ केअर' नावाचा फार्मसी व्यवसाय होता. रविवारी सुट्टी असतानाही एका रुग्णाला तातडीने औषध पोहोचवण्यासाठी तो रात्री घराबाहेर पडला होता.