नागपूर शहर: ऑनलाईन सट्टेबाजीच्या नादात व्हेटरनरी डॉक्टर बनला चोर; लोहमार्ग पोलिसांकडून २२ लाखांच्या चोरीचा पर्दाफाश
ऑनलाईन सट्टेबाजीत हरलेले पैसे फेडण्यासाठी चोरीचा मार्ग पत्करणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुण पशुवैद्यकीय विद्यार्थ्याला नागपूर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. रोहित मारोती दुय्येवार असे या आरोपीचे नाव आहे.२८ मार्च रोजी बिकानेर एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठ दांपत्याची २२.७० लाख रुपयांचे दागिने व पैसे असलेली पर्स आरोपीने लांबवली होती.