जालना: श्री गणेशा आरोग्याचा उपक्रमाला जालना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; 690 आरोग्य शिबिरांत 34 हजार 708 नागरिकांची तपासणी
Jalna, Jalna | Sep 23, 2026 गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणी व आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या मार्गदर्शनाखाली ‘श्री गणेशा आरोग्याचा 2.0’ हा विशेष आरोग्य उपक्रम राबविण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत जिल्ह्यात 690 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये तब्बल 34 हजार 708 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.