वसई: नालासोपारा परिसरातून २५ लाख रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी, चौघांना अटक
Vasai, Palghar | Jan 17, 2025 नालासोपारा परिसरातून २५ लाख रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ८ जुलै २०२४ ला घरफोडीच्य गुन्ह्याची नोंद झाली होती. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी ३-४ महिन्यात ३ आरोपींना अटक केलं होत त्या आरोपींची चौकशी केली असता एक आरोपी वेशांतर करून नोएडा इथं रिक्षा चालवत होता त्यामुळे पोलिसांनी आज या आरोपीला नोएडा इथून अटक केलं आहे.