नागपूर शहर: शांतीनगर पोलिसांची मोठी कारवाई: घातक शस्त्रासह फिरणाऱ्या आरोपीला अटक
13 मे ला रात्री 8 वाजता मिळालेल्या महितीनुसार शांतीनगर पोलिसांनी रात्री गस्तीदरम्यान एका सराईत गुन्हेगाराला घातक शस्त्रासह अटक केली आहे. अब्दुल रहमान उर्फ रम्मु असे आरोपीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लालनगर परिसरात आरोपी लोखंडी चाकू घेऊन लोकांना धमकावत व गोंधळ घालत होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याजवळील शस्त्र जप्त केले. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.