हवेली: पुण्यातील जेधे चौकात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गुंगीकारक औषधी गोळ्यांवी विक्री करणाऱ्या दोघांना पकडले
Haveli, Pune | Dec 1, 2025 नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्या उत्तर प्रदेशातून कुरिअरद्वारे मागवून पुण्यात विक्री करणाऱ्या दोघा जणांना खडक पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील स्कुटरची डिकी आणि घरातून तब्बल १ लाख ४७ हजार रुपयांच्या ६ हजार ९०० गुंगीकारक गोळ्या जप्त केल्या आहेत.समीर हमीद शेख,आणि सुनिल गजानन शर्मा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.