नागपूर शहर: मित्राच्या डोक्यात घातला लाकडी दांडका, आरोपीला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी: हरेश काळसेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी 22 मे ला दुपारी 05:30 ने दिलेल्या माहितीनुसार मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडा परिसरात दारूच्या नशेत दोन मजुरांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान रक्तरंजित संघर्षात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कपडे चोरल्याचा आळ घेतल्याने संतप्त झालेल्या एका मजुराने आपल्याच सहकाऱ्याच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सुनील बरमइया हा मजूर गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या मेयो रुग्णाल