अखील भारतीय आदिवासी विकास परीषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामसाहेब चव्हाण यांनी भद्रावती ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन तेथील रुग्णांशी संवाद साधला. वैद्यकीय अधिक्षक डा.मनीष सिंग यांच्याशी चर्चा करुन रुगणालयातील सुविधांबद्दल आढावा घेतला.काही महिन्यांपूर्वी आदिवासी विकास परिषदेतर्फे सदर रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले होते.