भोकरदन: नगर परिषदेमध्ये सफाई काम करणाऱ्या चा मुलगा झाला शिक्षक, नगर परिषदेत करण्यात आला सत्कार
आज दि.31 ऑगस्ट 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन नगरपरिषद कार्यालयामध्ये सत्कार समारंभ पार पडला आहे,हा सत्कार समारंभ म्हणजे अभिमानाची गोष्ट, भोकरदन नगर परिषदेमध्ये मागील कित्येक वर्षापासून सफाई काम करणारे सफाई कामगार भीमराव बोर्डे यांचा मुलगा राहुल भीमराव बोर्डे यांनी आपल्या वडिलांचे कष्टाचे सोनं केलं आहे,पवित्र पोर्टलच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्था सातारा येथे त्यांनी शिक्षक पदाला गवसणी घातली असून त्याबद्दल त्याचा नगरपरिषदेने पत्रकारांनी सत्कार केला.