*झोन क्र.४ बडनेरा परिसरात सौंदर्यीकरणाच्या कामांना वेग : अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांची स्थळ पाहणी* अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्र.४ बडनेरा परिसरातील नागरिकांना अधिक स्वच्छ, आकर्षक आणि सुशोभित परिसर मिळावा यासाठी महानगरपालिकेकडून विविध ठिकाणी सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेचा शुभारंभ आज अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी आज स्वतः प्रभाग क्र.२० मधील विविध ठिकाणांची पाहणी केली.