तालुक्यातील पाटाळा गावातील राजु खरवडे यांच्या घरात धान्य साठविण्यासाठी असलेल्या ड्रमच्या मागे व कुलरमधे नागाची सात पिल्ले व नव अंडी आढळल्याने घरातील लोकांची भितीने चांगलीच तारांबळ ऊडाली.या प्रकाराची माहिती सर्पमित्र संदीप जिवने यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन आपल्या सहकार्यांच्या सहाय्याने सर्व पिल्ले व अंडी वर्धा नदिपरीसरातील सुरक्षित अविवासात सोडले.