नागपूर शहर: मानकापूर पोलिसांची मोठी कारवाई: एनजीओ संचालकास अटक; पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी दिली महत्त्वाची माहिती
पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी 21 एप्रिल ला दुपारी 3 वाजता दिलेल्या माहितीनुसार मानकापूर पोलिसांनी 'युनिव्हर्सल मल्टिपर्पज सोसायटी' नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या संचालकावर, रियाज फझल काझी, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे. काझीवर महिलांच्या लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप आहे.पोलिस उपायुक्त नित्यानंद झा यांनी या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितले की, आरोपीची संस्था मुख्यत्वे झोपडपट्टी भागातील मुलांना शिक्षण देण्याचे काम करत असल्याचे भासवून लोकांची दिशाभूल करत होती.