नागपूर शहर: नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे अजनी पुलावर टळला अनर्थ; आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा वाचवला जीव, बघा थरारक व्हिडिओ
शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या अजनी पुलावर शुक्रवारी एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तेथून जाणाऱ्या सतर्क नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने एका तरुणीचा जीव वाचला आहे. या धाडसी कृत्यामुळे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी आज दुपारच्या सुमारास अजनी पुलावर आली होती. ती बराच वेळ पुलाच्या कठड्यावर बसून खाली रेल्वे रुळांच्या दिशेने पाहत होती.