नागपूर शहर: नागपुरात पोलीस व्हॅनचा थरार; प्रेस क्लब चौकात उभ्या वाहनांना दिली जोरदार धडक
शहरातील उच्चभ्रू परिसर असलेल्या सिव्हिल लाइन्स येथील प्रेस क्लब चौकात शुक्रवारी एका भरधाव पोलीस व्हॅनने चांगलाच धुमाकूळ घातला. सिग्नलवर थांबलेल्या अनेक वाहनांना पाठीमागून येणाऱ्या पोलीस व्हॅनने जोरदार धडक दिली, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेस क्लब चौकात सिग्नलमुळे वाहने रांगेत उभी होती. त्याच वेळी नियंत्रण सुटलेली एक पोलीस व्हॅन वेगाने आली आणि समोर उभ्या असलेल्या कार व दुचाकींना धडकली.