औंढा नागनाथ: येथील पोलीस ठाण्याची उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्याकडून वार्षिक तपासणी
औंढा नागनाथ येथील पोलीस ठाण्याची उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांनी दिनांक १५ ऑक्टोबर बुधवार रोजी वार्षिक तपासणी केली आहे.सकाळी नऊ वाजता त्यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर परेड निरीक्षण करून परेड घेण्यात आली,अंमलदार यांची सीटरीमार्क घेतली, प्रलंबित गुन्हे व ठाणे अभिलेखाची तपासणी केली. यावेळी पोनि जीएस राहिरे, सपोनि कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले, अफसर पठाण,शेख खुद्दुस,सपोउपनि पंजाब थिटे,जमादार गजानन गिरी,वसीम पठाण,सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.