नागपूर शहर: कळमना रेल्वे स्टेशन परिसरात कामावर असताना भीषण अपघात; कामगाराचे दोन्ही पाय निकामी
नागपूरमध्ये कामाच्या ठिकाणी एका कामगाराचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात चेतन मोर्या नामक कामगाराचे दोन्ही पाय गंभीररीत्या जखमी झाले असून ते पूर्णपणे निकामी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चेतन मोरिया 'माथाडी कामगार' म्हणून कार्यरत आहे. मालवाहतूक करणाऱ्या एका मोठ्या कंटेनर 'बॉक्स' मध्ये मालाचे पॅकिंग करत असताना अचानक वरून एक अवजड लोखंडी ब्लेड त्याच्या पायावर पडली.