लातूर: निलंगा येथे उद्या काँग्रेसचा भव्य मेळावा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संघटक अजित निंबाळकर यांची माहिती
Latur, Latur | Oct 30, 2025 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निलंगा काँग्रेस कमिटीची अधिकृत बैठक दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता वृंदावन मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीला जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंखे, तसेच तीन तालुक्यांतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संघटक अजित निंबाळकर यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.