नागपूर शहर: ग्रामपंचायतींचे वॉटर ऑडिट होणार;तर वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या समस्येवर तातडीने कारवाईचे पालकमंत्र्यांनी दिले संकेत
राज्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि जलव्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी आता ग्रामपंचायत स्तरावर एक महत्त्वपूर्ण प्रायोगिक उपक्रम राबवला जाणार आहे. याअंतर्गत गावातील पाण्याच्या सर्व स्रोतांचे 'वॉटर ऑडिट' (पाणी परीक्षण) केले जाईल.