करवीर: नशा मुक्त कोल्हापूर साठी प्रत्येक जिल्हावासीयाने सहभाग घ्यावा - जिल्हाधिकारी अमोल येडगे
जिल्ह्यात नशामुक्तीचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी आणि समाजात जनजागृती करण्यासाठी २९ सप्टेंबरपर्यंत नशामुक्ती प्रबोधन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नशामुक्त कोल्हापूर’ हा नारा देत प्रत्येक जिल्हावासीयाने या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केले आहे.