सेलू: निम्न दूधना प्रकल्पातून चौदा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग : राजवाडी पूलावर पाणी : सेलू -वालूर रस्ता बंद
Sailu, Parbhani | Sep 16, 2025 निम्न दूधना प्रकल्पाचे चौदा दरवाजे उघडण्यात आले असून 16 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास नदीपात्रात १६ हजार२७२ क्यूसेस पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सेलू तालुक्यातील राजवाडी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सेलू वालू वाहतूक बंद करण्यात आली आहे. तरी कुणीही दुधना नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठल्याही धोकादायक पुलावरून वाहतूक करू नये तसेच कुठलीही जीवित व वित्त आणि होऊ नये याकरिता नदीकाठच्या गावांना खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन परभणी जिल्हा प्रशासनास व जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरि