नागपूर शहर: भररस्त्यात रागाच्या भरात तरुणाने फोडल्या बाटल्या; वाहतुकीची तमा न बाळगता संताप व्यक्त
टेका नाका परिसरात गजबजलेल्या उड्डाणपुलाखाली एका तरुणाने भररस्त्यात पाण्याचे 'जार' आदळून फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे संताप व्यक्त केल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक तरुण रस्त्याच्या कडेला उभा राहून आपल्या खांद्यावरून पाण्याचे जार एकामागून एक जोरात जमिनीवर आदळत आहे.