जालना: महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाच्या आकडेवारीत 100 कोटींची चूक; नगरसेवक श्रीकांत पांगाकर सभागृहात आक्रमक
Jalna, Jalna | Mar 30, 2026 आज दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेचा 468 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मात्र, या अर्थसंकल्पातील आकडेवारीच्या बेरीजमध्ये तब्बल 100 कोटी रुपयांची चूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ही बाब नगरसेवक श्रीकांत पांगाकर यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सभागृहात एकच खळबळ उडाली. एवढ्या मोठ्या आर्थिक दस्तऐवजात अशी गंभीर चूक कशी झाली, यावरून श्रीकांत पांगाकर सभागृहात आक्रमक झाले. या प्रकाराची माहिती इतर नग