नागपूर शहर: कपिलनगर पोलिसांकडून घातक शस्त्रासह आरोपीला अटक
27 मे ला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार,कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समता नगर परिसरातील एकता बुद्ध विहारजवळ पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले.विशाल किरण शेंडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्याच्या पँटच्या आतल्या खिशात १०० रुपये किमतीचा एक लोखंडी चाकू मिळून आला.आरोपीविरुद्ध कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.