नागपूर शहर: नागपुरात किरकोळ वादातून चाकू हल्ला; तरुणावर गंभीर वार, दोन आरोपी अटकेत: विवेकानंद भारती पोलीस निरीक्षक
यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेकानंद भारती यांनी 30 जून ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार,नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ईटाभट्टी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर चाकूच्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक विवेकानंद भारती यांनी दिली आहे.