नागपूर शहर: भरचौकात तरुणाचा राडा! कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावरच ठिय्या
उपराजधानीतील शंकर नगर चौक परिसरात आज एका तरुणाने चांगलाच गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणाने भररस्त्यात आपले कपडे काढून अर्धनग्न होत थेट चौकाच्या मध्यभागी लोटांगण घातले, ज्यामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.मिळालेल्या माहितीनुसार, शंकर नगर या गजबजलेल्या चौकात एका अज्ञात तरुणाने अचानक गोंधळ घालण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात किंवा अन्य कोणत्याही कारणाने त्याने अंगातील कपडे काढून टाकले