राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नगर परिषदेचे अध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार संजय पारवे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रसेंजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी दिल्याने महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली.