अकोला : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी सोयाबीनची ३,१५३ क्विंटल अशी मध्यम आवक झाली. आवक घटत असली तरी शेतकऱ्यांना मिळालेल्या दरांमध्ये स्थिरता दिसून आली. प्रतिक्विंटल कमाल ४,५२०, सरासरी ४,४३०, तर किमान ४,००० रुपये असा व्यवहार झाला. बाजार समितीच्या म्हणण्यानुसार, मागील दोन दिवसांपासून आवक कमी होत असल्याचा कल पाहायला मिळत आहे.