नितेश गणेशराव मेश्राम वय वर्ष 30 राहणार मांजरखेड यांनी महादेव भामुदरे वय वर्ष 30 राहणार मांजरखेड च्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. नितेश या शेतातून काम करून घरी आला व गावातील गुपचूपच्या गाडीजवळ उभा असताना महादेव तिथे दारू पिऊन आला व शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली व खाली पाडून डोक्यावर काठीने मारून जखमी केले अशी तक्रार चांदुरलेले पोलिसात नितेश यांनी दिली आहे .तेव्हा पोलिसांनी विविध कलमाने गुन्ह्याची नोंद केली आहे.