लातूर: महावितरण अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून व्यापाऱ्याचा संताप,लातूर एमएसईबी कार्यालयात स्वतःला घेतले कोंडून,पोलीस तैनात
लातूर- महावितरण अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट वर्तनाचा आणि टाळाटाळीचा निषेध म्हणून अंबाजोगाई येथील व्यापारी श्रीकर फड यांनी लातूरमधील एमआयडीसीतील महावितरणच्या मुख्य कार्यालयात आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी रात्री सात वाजण्याच्या दरम्यान स्वतःला कोंडून घेतले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.व्यापारी श्रीकर फड यांचा आरोप आहे की, त्यांच्या मालमत्तेतील वीज लाईन दुसरीकडे वळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केली होती.