लातूर,-शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस विभागाकडून बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कडक दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. चारचाकी, दुचाकी आणि अॅटोरिक्षा चालकांकडून सार्वजनिक रस्त्यांवर बेशिस्तपणे पार्किंग करणे, तसेच रिंगरोडवरील सर्व्हिस रोडवर अडथळा निर्माण करणारे वाहन उभे करणे यावर ई-चलान मशिनच्या माध्यमातून कारवाई करण्याची १५ दिवसांची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.या मोहिमेचे मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे करत आहेत.