नागपूर शहर: नागपुरात ६० वर्षीय महिला गांजासह अटक ; 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत मोठी कारवाई : पोलीस उपनिरीक्षक राठोड
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी 8 मे ला दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जाणाऱ्या 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत कोतवाली पोलिसांनी उधोजी नगर परिसरातून एका ६० वर्षीय वृद्ध महिलेला गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक केली आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी दिली आहे.