नागपूर शहर: कळमना येथे तरुणाची निर्घृण हत्या; मुख्य आरोपी गजाआड: प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 25 एप्रिलला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील 'काच कंपनी' परिसरात आपसी वादातून रोशन धरम सिंग उईके या तरुणाची कुऱ्हाड आणि चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुख्य आरोपी जावेद उर्फ शकील अंसारी याला अटक केली आहे. या प्रकरणात एकूण पाच जण सामील असल्याचे निष्पन्न झाले असून, उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.