नागपूर शहर: कलमना वस्तीत संतापजनक प्रकार: रेशनमधील गैरप्रकाराचा व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणावर हल्ला; लहान भाऊ गंभीर जखमी
16 एप्रिलला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार स्वस्त धान्य दुकानात होणाऱ्या अनियमिततेविरोधात आवाज उठवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. रेशन दुकानदाराने केवळ तक्रार करणाऱ्या तरुणालाच मारहाण केली नाही, तर मध्यस्थी करायला आलेल्या त्याच्या लहान भावावरही हल्ला चढवून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. ही खळबळजनक घटना कलमना वस्ती परिसरात घडली असून यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला असून पीडितानी न्यायाची