अंजनगाव सुर्जी येथील नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि योग्य नियोजन केल्याबद्दल आज सायंकाळी ३ वाजता नगर परिषद कार्यालय येथे अंजनगाव पॉवर ऑफ मीडिया व अखिल भारतीय पत्रकार संघ यांच्या कडून मुख्याधिकारी विजय लोहकरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यादरम्यान उपस्थित पत्रकारांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तसेच मागील चार वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळात शहराचा विकास रखडला आहे त्याबाबतीत उपस्थित पत्रकारांनी त्यांना अवगत करुन दिले.