नांदेड: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गिरी क्लासेसचा अनोखा उपक्रम; १४ तास शिकवणी : प्रा.गिरीची बाबानगर येथे माहिती
Nanded, Nanded | Apr 13, 2025 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत 'गिरी पीएसीएमबी क्लासेस, नांदेड'चे संस्थापक व प्रा. संतोष गिरी यांनी एक अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. १४ एप्रिल रोजी सलग १४ तास केमिस्ट्री शिकवून नीट व जेईई-सीईटी परीक्षांची सखोल उजळणी विद्यार्थ्यांना करून दिली जाणार असल्याची माहिती आज रविवार दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी नांदेड शहरातील बाबानगर परीसरात आपली प्रतिक्रिया देताना प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती आज दिली आहे.