बहुजनांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी म्हणून भाऊसाहेबांनी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. केवळ संस्थाच काढली नाही, तर खेड्या -पाड्यात शाळा सुरू करून गरीब व आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिक्षणाची सोय केली आहे. आज संस्थेच्या शैक्षणिक शाखा इतक्या विस्तारित झाल्या असून सर्वच प्रकारच्या अद्यावत व उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने भाऊसाहेबांची स्वप्नपूर्ती होतांना दिसत आहे. भाऊसाहेबांचे शैक्षणिक विचार हे समाजासाठी प्रेरक असून आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतांना त्या शिक्षणाचा